E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोहगड किल्ल्याचा काही भाग कोसळला सुदैवाने जीवितहानी नाही
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
लोणावळा, (वार्ताहर) : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भाजे गावाच्या दिशेने काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दरड कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाशी संपर्क साधला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
लोहगड किल्ल्याच्या पूर्व दिशेला लोहगड गाव वसलेले असून, किल्ल्यालगतच गावातील वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या ६५० हून अधिक आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे भाजे गाव आहे. राज्यभरात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे किल्ल्याच्या उत्तर बाजूला दरड कोसळण्याची घटना घडली. दरड कोसळल्यानंतर परिस्थितीची पाहणी करून महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने घटनेची नोंद घेतली आहे. दरड लहान प्रमाणात कोसळल्यामुळे कुठलीही हानी झालेली नाही. मात्र हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे संभाव्य धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांनीही ग्रामस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणा सतर्क असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
या घटनेविषयी माहिती देताना मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख म्हणाले, लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूला काही भाग कोसळल्याची माहिती मिळाली असून, याबाबत आवश्यक ती चौकशी सुरू आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Related
Articles
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक